डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या नविन कोपर उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. या उड्डाण पुलाच्या परिसरातून जात असलेल्या विद्युतवाहिन्यांचे पुश-थ्रू च्या माध्यमातून भूमिगत करण्याचे काम सुरु असून महिन्याभरात हे काम पूर्ण होईल. तसेच या उड्डाण पुलाचे दोन पिलर उभारण्याचे काम सुरु असून या पुलाच्या गर्डरचे काम वेगाने सुरु आहे. पुलाची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन हा पूल नोव्हेंबर अखेर पर्यंत वाहतुकीकरिता खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कल्याण दिशेकडील रेल्वेवरील पादचारी पुलाचीही पाहणी करत आढावा घेतला. आता पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून ३० ऑगस्ट पर्यंत हा पूल नागरिकांकरिता खुला करण्यात येणार आहे.