कोरोनानंतरच्या काळात नव्या उपाययोजनांसह विवियाना मॉल पुन्हा ग्राहकांसाठी सज्ज

कोरोना नंतरच्या काळात मॉल्स पुन्हा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर विवियाना मॉलतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल ६८ टक्के नागरिकांनी मॉल सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात विविध कारणांसाठी मॉलला जाण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यात ५ ऑगस्टपासून मॉल्स सुरू करण्याला शासनानं परवानगी दिली असून त्या पार्श्वभूमीवर विवियाना मॉलतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. तर ६१ टक्के नागरिकांनी आधीच बुकींग करण्याची तयारी दर्शवली. ज्या दुकानात खरेदी करायची आहे त्याची वेळ निश्चित करून भेट देण्याला ४८ टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली. या निष्कर्षांवरून विवियाना मॉलने बुक माय शो सोबत करार केला असून त्याद्वारे ग्राहकांना बुकींग करून मॉल मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी नाममात्र १० रूपये शुल्क भरून वेबसाईटवरून कूपन घ्यावे लागणार आहे. मॉलमध्ये खाण्याच्या पदार्थांची सेवा संपर्क विरहित मिळावी अशी अपेक्षा ९४ टक्के ग्राहकांनी व्यक्त केली. तर ३२ टक्के नागरिकांनी दर आठवड्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ८५ टक्के नागरिकांनी स्वत:च्या वाहनातून मॉलमध्ये जाण्यास प्राधान्य देऊ असं सांगितलं तर केवळ ११ टक्के लोकांनी रिक्षा किंवा कॅबद्वारे जाण्यास पसंती दाखवली. ८७ टक्के नागरिकांनी कॅशलेस सुविधेला प्राधान्य दिलं आहे. लॉकडाऊन नंतरच्या काळात अधिक चांगली सेवा देण्यासाठी सेव्हन सीज मॉडेल विकसित करण्यात आल्याचं विवियाना मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज अगरवाल यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक त्या सर्व उपाययोजना मॉल व्यवस्थापनानं केल्या असून ग्राहकांसाठी नव्या उपाययोजनांसह मॉल सज्ज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading