कळवा पूल दिवाळीपूर्वी सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कळवा पूलाचं काम पूर्ण होऊनही कळवा पूल वाहतुकीसाठी का खुला होत नाही याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली. कळवा आणि ठाण्यामधील तिस-या खाडी पूलाचं काम जवळपास पूर्ण होऊनही अद्याप पूल सुरू झालेला नाही. पूल सुरू होण्याचे अनेक मुहुर्त टळले. त्यामुळं हा पूल नक्की का सुरू होऊ शकत नाही याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. किरकोळ कामामुळे पूलाचं काम रखडलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पध्दतीनं उद्घाटन केलं जाईल असा इशारा शहरअध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला. आम्हांला कोणतेही श्रेय घ्यायचं नाही पण दिवाळीपर्यंत हा पूल सुरू करावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी पाहणीनंतर केली. अगदी बारीकसारीक कामं बाकी असून शासनानं मनावर घेतल्यास हा पूल रहदारीसाठी लवकर खुला होऊ शकतो. त्यामुळं पूलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading