गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे सर्व सण उत्सवांवर निरूत्साहाची झाक होती पण यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्यामुळे दसरा उत्साहात साजरा झाला. दस-याच्या मुहुर्तावर होणारी सोनं आणि वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. दसरा सण हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजला जातो. त्यामुळं या दिवशी सोने आणि वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. यंदा त्याचाच अनुभव आला. यंदा दुचाकीच्या विक्रीमध्ये साधारणत: ३५ ते ४० टक्के वाढ झाली. तर चारचाकी वाहनांनाही मोठी मागणी होती. इलेक्ट्रीकल वाहनं खरेदीसाठीही मोठी मागणी असल्याचं दिसून आलं. वाहन खरेदीमध्ये दुचाकी वाहन खरेदीस मोठा उठाव असल्याचं पहायला मिळालं.