जिल्हा वार्षिक योजनांचा निधी येत्या पंधरा दिवसात संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीमार्फत 2022-23 या वर्षासाठी वार्षिक योजनांअंतर्गत विकास कामांसाठी वितरित करण्यात आलेला निधी संपूर्ण खर्च होईल याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. हा निधी खर्च करताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जाईल याचीही खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विभागांना विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आणि कामाच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला.
जिल्हा वार्षिक योजनांसाठी दिलेल्या निधीच्या खर्चाचा यंत्रणा निहाय आणि योजनानिहाय आढावा यावेळी जिल्हाधिका-यांनी घेतला. जिल्हा वार्षिक निधीतून करण्यात येणारी विकास कामे ही दर्जेदार असावीत. तसेच ही कामे वेळेत पूर्ण करून मार्चअखेरपर्यंत हा निधी पूर्णपणे खर्च होईल, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. विविध विभागांना प्रशासकीय मान्यतेच्या आधारे देण्यात आलेला निधी तातडीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा असे जिल्हाधिका-यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading