भिवंडी लोकसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 49 टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 23 भिवंडी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.89 टक्के मतदान झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे—-134 भिवंडी ग्रामीण – 58.00 टक्के135 शहापूर – 50.99 टक्के136 भिवंडी पश्चिम … Read more

प्रचंड उकाड्यात, घामाच्या धारेत,मतदारांच्या मतदानासाठी रांगा

ढोकळा येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना असा अनुभव आला.या मतदान केंद्रावर जवळपास हजार एक मतदार मतदानासाठी उभी होती मात्र प्रचंड उकाड्यात घामाच्या दारात या मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स – बुथ क्र. ११७ ते १२० – उभारले आहेत. येथे सकाळी … Read more

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकुटुंब मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात सहकुटुंब जाऊन मतदान केले.मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आज सकाळपासूनमतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून, सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 5.39 टक्केमतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 5.39 टक्के मतदान झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे140 अंबरनाथ – 5.89 टक्के141 उल्हासनगर – 3.27 टक्के142 … Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे 5.67 टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली.25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 5.67 टक्के मतदान झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे— 145 मिरा भाईंदर – 6.14 टक्के146 ओवळा … Read more

त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास – श्रीकांत शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर आरोप

कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं. जेव्हा ठरवलं त्याच्यावर पण विश्वास नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यांना कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर नेत्यांवर कधीच विश्वास नव्हता त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे कल्याण पूर्वेत उद्घाटन झाले. या उद्घाटनप्रसंगी श्रीकांत शिंदे … Read more

शिळफाटा उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत

संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरून कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत.

Read more

आता थोडे दिवस उरले आहेत उगीच नादी लागू नका, तोंड उघडलं तर तुम्हांला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही – राजन विचारेंचा इशारा

धर्मवीर चित्रपटातील दृश्यांवर अडीच वर्षानंतर का बोलता, या चित्रपटाचे खरे किस्से आपल्याला माहित आहेत. आता थोडे दिवस उरले आहेत उगीच नादी लागू नका, तोंड उघडलं तर तुम्हांला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही असा खमखमीत इशारा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी दिला.

Read more

राजन विचारे हे दिघेंचे नकली शिष्य आहेत तर नरेश म्हस्के असली शिष्य – मुख्यमंत्री

धर्मवीर आनंद दिघेची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघेंची कुठे प्रॉप्रटी आहे असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे यांच्या प्रॉपर्टीवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Read more

संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

ठाणे महापालिकेनं संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याच्या अनिर्बंध वापरावर निर्बंध लावले आहेत.

Read more

Categories TMC