महापौर आणि महापालिका आयुक्तांतर्फे ठाणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने भक्तिमय वातावरणात साजरा करत ठाणेकरांना हा सण आरोग्यदायी, सुखकर जावो अशा भावनिक शुभेच्छा महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. या संपूर्ण वातावरणात उद्या विघ्नहर्ता … Read more

महापालिकाआयुक्तां कडून विर्सजन घाट आणि कृत्रिम तलावांची पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमुर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विशेष खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोलशेत विसर्जन महाघाट … Read more

ठाणे जिल्ह्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत ६६ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज ६६ हजार ४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंतची आकडेवारी असून अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ७३ हजार ७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ३९ लाख ४ हजार ३४९ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १५ लाख ६८ हजार ७२९ नागरिकांना दुसरा … Read more

महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी केली मार्केटची पाहणी

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे. दरम्यान महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वतः नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी करून यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी … Read more

ठाण्यात उद्या लसीकरण बंद

ठाण्यामध्ये उद्या लसीकरण बंद राहणार आहे सध्या डेल्टा प्रकाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणावर जोर दिला जात असून ठाणे महापालिकेनेही लसीकरण करण्याची मोहीम जोरदार हाती घेतली आहे. लसीकरण वाढवण्यासाठी विविध उपाय केले जात असून लसीकरणासाठी विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लसीकरण ,घराजवळ लसीकरणअशा विविध माध्यमातून बसिकरण केलं जात आहे. ठाणे महापालिकेकडे लसीकरणाचा साठा … Read more

ठाणे महापालिकेनं दिली ८५ रूग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी

ठाणे महापालिकेच्या वतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत शहरातील जवळपास ८५ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान या धोरणातंर्गत पाहिलं खासगी आस्थापना लसीकरण केंद्र आदित्य बिर्ला ग्रुपने सुरु केले असून रोज ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण याप्रमाणे आतापर्यंत एकूण २२०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे.

Read more