ठाणे जिल्ह्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत ६६ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज ६६ हजार ४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंतची आकडेवारी असून अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ७३ हजार ७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ३९ लाख ४ हजार ३४९ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १५ लाख ६८ हजार ७२९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ३७७ सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading