​पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जातं. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचेही पालकमंत्री आहेत. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचं प्राबल्य आहे. एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीमध्ये विकास कामांचा धडाका लावला असून अनेक नक्षलवाद्यांना मूळ प्रवाहात आणलं आहे. त्यामुळं गडचिरोली आणि आजूबाजूच्या परिसरातील नक्षलवादी नाराज असल्याचं सांगितलं जातं. या नाराजीतूनच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जातं. भामरागड विभागीय समितीनं ही ठार मारण्याची धमकी दिली असून त्याबाबतचे पत्र त्यांच्या शासकीय निवासस्थानीही पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading