हैद्राबाद येथे तयार करण्यात आलेल्या दुस-या पत्रीपूलाच्या गर्डरची पाहणी

हैद्राबाद येथे तयार करण्यात आलेल्या दुस-या पत्रीपूलाच्या गर्डरची पाहणी रेल्वे आणि राईट संस्थेच्या अधिका-यांनी केली असून या गर्डरला मंजुरी दिली असल्यामुळं पत्रीपूलाचं काम मार्च अखेर पूर्ण होईल असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. जुना पत्रीपूल पाडल्यानंतर कल्याण पूर्व -पश्चिम प्रवासासाठी होणारा त्रास, वेळेचा अपव्यय आणि रहदारीची समस्या यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. भविष्यात रहदारीची समस्या होऊ नये म्हणून दुस-या पत्रीपूलाची मागणी देखील त्यांनी मंजूर करून घेतली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी हैद्राबाद येथे जाऊन या गर्डरच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर पुन्हा ८ जानेवारीला कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांसह वरिष्ठ अधिका-यांसमवेत पूलाच्या कामाची पाहणी केली होती. रेल्वेच्या अधिका-यांनीही हैद्राबाद येथे जाऊन गर्डरची पाहणी करून गर्डरला मंजुरी दिली आहे. त्यामुळं पुढील १० दिवसात या गर्डरचे सुटे भाग करून हा गर्डर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आणला जाणार असून त्याची पुनर्जोडणी करून हा गर्डर बसवला जाणार आहे. त्यामुळं या पूलाचं काम पूर्ण होऊन मार्च अखेरीपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ठ पूर्ण होणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading