कुस्तीच्या सरावासाठी लवकरच स्वतंत्र संकुल उपलब्ध केलं जाईल – एकनाथ शिंदे

कुस्तीच्या सरावासाठी लवकरच स्वतंत्र संकुल उपलब्ध केलं जाईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केली. ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेचं पारितोषिक वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. महापौर चषक पुरूष गटात पैलवान मारूती जाधव तर महिला खुला गटातून सृष्टी भोसले मानकरी ठरले. मारूती जाधव यांना सव्वा लाख रूपये रोख, द्वितीय पारितोषिक पटकावणा-या सिकंदर शेख यांना ७५ हजार रूपये तर तृतीय पारितोषिक पटकावणा-या सुहास गोडघे यांना ६० हजार रूपयांचं पारितोषिक देण्यात आलं तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक बाला रफीक शेख यांना देण्यात आलं. महिला गटात सृष्टी भोसले यांना ७५ हजार रूपये, द्वितीय पारितोषिक मनिषा दिवेकर यांना ४० हजार रूपये, तृतीय पारितोषिक प्राजक्ता पानसरे यांना २० हजार रूपये तर चतुर्थ पारितोषिक भाग्यश्री भोईर यांना १० हजार रूपये देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading