स्वच्छतेविषयक अभिनव स्पर्धेत कुंजविहार उपहारगृहाला प्रथम क्रमांक

लायन्स क्लब ठाणे नॉर्थ आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान तसंच महापालिका आयोजित स्वच्छतेविषयक अभिनव स्पर्धेत कुंजविहार उपहारगृहाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून ठाण्यातील खाद्यगृह, उपहारगृह, पानशॉप अशा गर्दीच्या ठिकाणी जो दुकानदार स्वच्छतेचे आरोग्य विषयक नियम, निकष पाळून आपला व्यवसाय चालवत असेल त्याला स्वच्छ ठाणे उपक्रमांतर्गत उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि पारितोषिक दिलं जाणार होतं. यामध्ये महिनाभर जवळपास २५ खाद्यगृहं, उपहारगृह, पानशॉप यांचे परिक्षण करण्यात आले. यामध्ये राजमाता स्नॅक्सला द्वितीय, कृष्णा स्वीटस् ला तृतीय तर जनता स्नॅक्सला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading