सिग्नल शाळेतील मुलांनीही जोरदार साजरी केली धुळवड

सिग्नल शाळेतील मुलांनीही धुळवड जोरदार साजरी केली. मात्र ही धुळवड साजरी करताना प्रकर्षानं या मुलांनी नैसर्गिक रंगांचा वापर केला. सिग्नल शाळेमध्ये यासाठी नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळाही घेण्यात आली. जास्वंद, झेंडू, हळद, बीट पासून तर थेट साखरेचे रंगद्रव्य कसे शोषून घ्यायचे आणि त्या रंगद्रव्याचे पाणी इतर सेंद्रीय पावडरमध्ये टाकून लाल, पिवळा, केशरी, बदामी, सफेद, निळा, चॉकलेटी असे विविध रंग कसे तयार करायचे या कार्यशाळेत दाखवण्यात आलं होतं. त्यानुसार नैसर्गिक रंग तयार करून सिग्नल शाळेच्या मुलांनी जोरदार धुळवड साजरी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading