होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानं सुपरमूनचं दर्शन

होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानं सुपरमूनचं दर्शन झालं. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. कालच्या फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या ३ लाख ५९ हजार ३७७ किलोमीटर अंतरावर आला होता. काल सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी पूर्व क्षितीजावर चंद्राचं दर्शन झालं. चंद्र नेहमीपेक्षा जास्त प्रकाशित दिसत होता. आता यानंतर पुन्हा ९ वर्षांनी १० मार्च २०२८ ला पुन्हा होळी पौर्णिमा आणि सुपरमूनचं दर्शन असा योग येणार आहे. काल होळी पौर्णिमा, सुपरमून दर्शन आणि विषुवदिन असा तिहेरी योग होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading