पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला कोविड लसीकरणाचा डोस

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज कोविड लसीकरणाचा डोस घेतला. कळवा प्रभाग समितीमध्ये कोविड लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी आयुक्तांसह पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनीही कोविड लसीकरणाचा डोस घेतला. यावेळी पोलीस आयुक्तालयातील एकूण ३० जणांना लसीकरण करण्यात आलं. यावेळी पोलीस आयुक्तांनी निसंकोचपणे कोणतीही भीती न बाळगता तसंच कुठल्याही खोट्या चर्चेला बळी न पडता लस घ्यावी असं आवाहन केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading