प्लास्टीक आणि थर्माकोल वापरणा-या आस्थापनांवर कारवाई करून पावणे दोन लाखांचा दंड वसूल

प्लास्टीक आणि थर्माकोल वापरणा-या आस्थापनांवर ठाणे महापालिकेनं अचानक कारवाई करून ३८० किलो प्लास्टीक जप्त करत पावणे दोन लाखांचा दंड वसूल केला. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यानुसार प्लास्टीक आणि थर्माकोल पासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर, विक्री, साठवणूक करण्यास बंदी आहे. यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४१४ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये ७१ आस्थापना दोषी आढळल्या. त्यांच्याकडून ३८० किलो प्लास्टीक जप्त करून १ लाख ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading