श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी

कोकण ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी मिळाली आहे. श्रीमलंगगडाच्या विकासासाठी खासदार श्रीकांत शिंदे गेली ५ वर्ष प्रयत्नशील होते. श्रीमलंगगडावर जाणा-या भाविक आणि स्थानिकांसाठी पाय-या, साकव आणि पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. फेनीक्युलरचं काम प्रगतीपथावर असून गावाअंतर्गत रस्तेही तयार करण्यात आले आहेत. श्रीमलंगगड येथे फेनीक्युलर गणपती मंदिर ते ऑस्ट्रेलियन टाकीकडे जाणा-या मुख्य रस्त्याचं काम करणे, श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी शिवमंदिर परिसरात भाविकांसाठी निवारा बांधणे तसंच श्रीमलंगगड बस स्थानक परिसरातील भाविकांसाठी शौचालय आणि प्रसाधनगृहही लवकरच बांधण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading