एक मतिमंद रूग्ण मेट्रोच्या खांबावर जाऊन चढल्यामुळे खळबळ

आज पहाटेच्या सुमारास एक मतिमंद रूग्ण मेट्रोच्या खांबावर जाऊन चढला होता. घोडबंदर परिसरात मेट्रोचं काम सुरू असून अशाच एका खांबावर बाबू चव्हाण हा ३५ वर्षीय युवक चढून बसला होता. घोडबंदर रस्त्यावरील सुरेश प्लाझा हॉटेलसमोरील मेट्रोच्या खांबावर बाबू चव्हाण हा मतिमंद जाऊन बसला होता. हे वृत्त कळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी धाव घेतली आणि खांबावर चढलेल्या बाबू चव्हाणची खांबावरून सुटका केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading