श्रीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची मागणी

श्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस लाठीमाराची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आज पहाटेच्या सुमारास ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. यावेळी पोलीसांनी दोन्ही गटावर लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. खासदार राजन विचारे आणि संजय घाडीगावकर यांच्या बाहेरून आलेल्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अश्लील भाषेचा वापर करत घोषणाबाजी केली. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले तिथे आधीच खासदार राजन विचारे आणि त्यांचे बाहेरून आलेले समर्थक बसले होते. यावेळी तक्रार दाखल करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण होऊन जमाव आक्रमक झाला. तसंच जमावाला उचकवण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलीस अधिका-यांच्या निदर्शनास आणल्यानंतर पोलीस अधिका-यांनी खासदार राजन विचारे यांच्या समर्थकांना समज दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर जाताना त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलीसांनी लाठीमार केला. पोलीसांनी एका गटाची बाजू घेऊन लाठीमार केलाच पण पोलीस नसलेली काही माणसंही जमावावर मारहाण करत होती. या लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading