श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे रिक्षाचालकांना धान्य वाटप

लॉकडाँऊनमुळे आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे घरी बसलेल्या निराधार रिक्षाचालकांच्या मदतीला खासदार श्रीकांत शिंदे धावून आले आहेत. संचारबंदीमुळे सर्वच ठिकाणी हातावर पोट असणा-यांची उपासमारीची वेळ आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध क्षेत्रामध्ये ५० हजारहून अधिक धान्य वाटप करण्यात आले असून कळवा, खारीगाव, विटावा या क्षेत्रातही रिक्षा चालकांना धान्य वाटप करण्यात आले. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत रिक्षा चालकांनी या धान्य वाटपाचा लाभ घेतला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading