ठाण्यातील हातावर पोट असलेल्या कलाकारांना मयुरेश कोटकर यांच्याकडून मदत

शहरातील कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कलाकारांच्या मदतीसाठी आगरी ऑल इन वन आणि आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख आणि कलाकार मयुरेश कोटकर धावून आले आहेत. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणा-या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही कधी सुरु होणार, पुढे काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही. बॅकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेकअप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ रंगमंच कलाकार, नृत्य कलाकार, सर्व बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ हे दैनंदिन रोजगारावर काम करत असतात. सध्या सर्व शुटिंग बंद असल्यामुळे या मंडळींना कठीण परिस्थितीतून जावं लागतं आहे. कलाकार आर्थिक दृष्ट्या संकटात आले असून त्यांची मासिक मिळकत बंद झाल्याने त्यांचे दैनंदिन जीवन संकटात आले आहे. ठाण्यातील अशा कलाकारांना आगरी ऑल इन वन या सामाजिक संस्थेतर्फे जीवनावश्यक किराणा वस्तू, तांदुळ, गहु, साखर, तेल, तिखट-मीठ इत्यादी साहित्य घरपोच देण्यात येत आहे.
मयुरेश कोटकर यांनी आतापर्यंत अनेक सिरीयल, सिनेमा, आणि २५ हुन अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. नाटक क्षेत्रातील अनेक बारकावे आणि बरेवाईट दिवस जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन स्वखर्चाने त्यांनी हे मदतीचं कार्य सुरू केलं आहे. ठाणे भिवंडी या परिसरात कलाकार मंडळी मोठ्या प्रमाणात राहतात. मयुरेश कोटकर यांच्या या कार्यात त्यांचे कुटुंबिय आणि मित्रमंडळीही तसंच संस्थेचे पदाधिकारीही सहकार्य करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading