शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलेल्या मुंब्र्यातील हजारो विद्यार्थ्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्यामुळे दिलासा

शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलेल्या मुंब्र्यातील हजारो विद्यार्थ्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. मुंब्रा येथील अनेक शाळांना सरकारी मान्यता नाही. मात्र या शाळांमधून सामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागानं मान्यता नसलेल्या शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसांमुळे अशा शाळांमधून शिकणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर टांगती तलवार होती. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि बंद पडणा-या शाळांतील विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन त्यांना अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत मागणी केली. महापालिका आयुक्तांनी आवश्यक त्या उपाययोजना करत कोणत्याही मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीकोनातून या विद्यार्थ्यांचं समायोजन करावे असे निर्देश शिक्षण विभागाच्या उपायुक्तांना दिले आहेत. समायोजन पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंब्र्यातील शाळांमध्येच या विद्यार्थ्यांचं समायोजन केलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading