शीळफाटा येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचं लोकार्पण

शीळफाटा येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचं लोकार्पण काल महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झालं. ठाणे शहरामध्ये स्वतंत्र इमारतीसह पायाभूत सुविधा असलेली ५ अग्निशमन केंद्रं होती. मिनाक्षी शिंदे यांच्या कार्यकाळात ३ अग्निशमन केंद्र आणि ४ क्षेत्रीय केंद्रं यांची भर पडली. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आता एकूण १२ अग्निशमन केंद्रं आहेत. शीळाफाटा येथील अग्निशमन केंद्रामुळे या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत मिळणं शक्य होणार आहे. शीळफाटा येथील अग्निशमन केंद्र हे स्वतंत्र इमारत आणि पायाभूत सुविधांसह परिपूर्ण आहे. तळ अधिक दोन मजल्याच्या या इमारतीत अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, नियंत्रण कक्ष, स्टोअर रूम, कर्मचा-यांसाठी व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading