महापौर दालनाबाहेर ठाण्याच्या आजी-माजी महापौरांची तैलचित्र

ठाण्याच्या आजी-माजी महापौरांची तैलचित्रं आता महापौर दालनाबाहेर लावण्यात आली आहेत. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या संकल्पनेतून या तैलचित्र अनावरणाचा सोहळा आज संपन्न झाला. ठाण्याचे पहिले महापौर सतिश प्रधान यांच्या हस्ते महापौर दालनाबाहेर लावलेल्या ठाण्याच्या आत्तापर्यंतच्या महापौरांच्या तैलचित्रांचं अनावरण आज झालं. महापौर सतिश प्रधान, वसंत डावखरे, मनोहर साळवी, मोहन गुप्ते, अशोक राऊळ, नईम खान, अनंत तरे, मनोहर गाढवे, विजया देशमुख, प्रमोद रजपूत, रमेश वैती, शारदा राऊत, राजन विचारे, स्मिता इंदुलकर, अशोक वैती, हरिश्चंद्र पाटील, संजय मोरे आणि मिनाक्षी शिंदे यांची तैलचित्रं लावण्यात आली आहेत. यापैकी वसंत डावखरे, मोहन गुप्ते, विजया देशमुख, राजन विचारे वगळता इतर सर्व आजी-माजी महापौर या तैलचित्र अनावरण सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading