दिवसा घरफोडी करणा-या आरोपींना गोव्यातून अटक – मुद्देमाल हस्तगत

नौपाडा पोलीसांनी दिवसा घरफोडी करणा-या आरोपींना गोव्यातून अटक केली असून त्यांच्याकडून चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. २३ ऑक्टोबरला करूणा ठाणगे यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी १० लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नौपाडा पोलीसांनी क्लोज सर्किट कॅमे-याचे चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बाबू खान, संजय कांबळे, विजयानंद इंगळे अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या चौकशीत त्यांच्या कब्जातील सव्वा दोन लाखांची ह्युंदाई कार आणि ७ लाख ८० हजारांचे २६ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading