शिवसेनेतर्फे 110 मुलांची ह्रदय विकाराची तपासणी

शिवसेना वीद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ज्युपिटर रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य ह्रद्यरोग शिबिरात राज्यातील 0 ते पंधरा वर्षे वयोगटातील 110 मुलांची ह्रदय विकारासाठी तपासणी करण्यात आली. जुपिटर रुग्णालयातील बालरोग तज्ञांनी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून आलेल्या मुलांसाठी टू डी इको चाचण्या घेतल्या. प्राथमिक परीक्षेनंतर हृदयविकाराचे निदान झालेल्या मुलांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी करण्यात आले.यामध्ये 65 मुलांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ह्रदय रोग सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज असलेल्या मुलांना याची कोणतीही किंमत सहन करावी लागणार नाही असे जुपिटर रुग्णालयाच्या डॉक्टर श्रीनिवास यांनी सांगितले. ज्युपिटर रुग्णालयातील बाल रोग विभागाने आतापर्यंत 15 हजारांहून अधिक मुलांचे परीक्षण केले असून साडेसातशे हून अधिक बालरोग हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading