नवीन पिढीला हवं ते करू द्यावं – सचिन तेंडुलकर

नवीन पिढीला हवं ते करू द्यावं असे प्रतिपादन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केल. देशातील आगामी पिढीला त्यांच्या आवडीचा खेळ खेळता यावा यासाठी त्यांना सक्षम करण्याच्या सामायिक हेथुन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर बोलत होते. मुंब्रा येथे महापालिकेने उभारलेल्या मैदानात सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. मुलींच्या फुटबॉल संघाच्या माध्यमातून हे क्रीडा संकुल प्रकाश झोतात आले. परंतु मैदानात प्रकाश नसल्याने जिल्ह्यातील मुलांना सूर्यास्तानंतर खेळणं अशक्य होत होतं. आता हे क्रीडा संकुल दिव्यांनी उजळून गेल आहे. मुंब्रा येथील शाळेच्या मैदानामध्ये दिव्यांची व्यवस्था  डीबीएस आणि सचिन तेंडुलकर यांनी संयुक्तपणे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading