शिवसेनेच्या सत्तेत वाटा देण्याच्या तयारीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विचारे विरोध गुंडाळला

ठाणे महापालिकेत सत्तेमध्ये वाटा देण्याचं आमिष दाखवल्यानंतर भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांचं बंड थंड झालं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारेंना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार न करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी घेतली होती. त्यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शवल्यावर या नगरसेवकांनी विचारेंना विरोध करण्याची भूमिका मागे घेतल्याचं सांगितलं जातं. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या समन्वय बैठकीत पालकमंत्र्यांनी सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर विचारे विरोध गुंडाळला गेला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading