तीन हात नाका परिसरात मेट्रोमुळं वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं वाहतूक पोलीसांचा मेट्रोच्या कामावर आक्षेप

तीन हात नाका परिसरात मेट्रोमुळं वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं वाहतूक पोलीसांनी मेट्रोच्या कामावर आक्षेप घेतला आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ चं काम सध्या हाती घेण्यात आलं आहे. या कामासाठी ठिकठिकाणी खोदाई सुरू करण्यात आली आहे. टिप टॉप प्लाझा, तीन हात नाका सिग्नल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर तीन ठिकाणी या मेट्रोचे खांब उभारले जाणार आहेत. हे खांब टाकण्यासाठी उभारलेल्या अडथळ्यामुळे तीन हात नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळं या ठिकाणी मेट्रोचे खांब उभारले तर वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेमुळं वाहतूक पोलीसांनी या खांबांना आक्षेप घेतला आहे. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांनी अलिकडेच या भागाची पाहणी केली. यावेळी पोलीसांनी आपले आक्षेप प्राधिकरणाच्या अधिका-यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. प्राधिकरणाच्या अधिका-यांनी हे खांब हलवण्यासाठी काही बदल करण्याची तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading