शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २१वी पुण्यतिथी धीरगंभीर वातावरणात संपन्न

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २१वी पुण्यतिथी आज धीरगंभीर वातावरणात संपन्न झाली. ठाण्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिका-यांनी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक नेते-कार्यकर्त्यांनी शक्तीस्थळावर येऊन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी असंख्य चाहत्यांचीही गर्दी झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading