शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तीन महिने हरवले असल्याच्या फलकानं खळबळ

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गेल्या तीन महिन्यांपासून दिसले नसल्यानं आमदार हरवले असल्याचे फलक त्यांच्या मतदार संघात दिसत असल्यानं खळबळ उडाली आहे. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिनिधीत्व करतात. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईनंतर आमदार प्रताप सरनाईक यांचं सार्वजनिक दर्शन दुर्लभ झालं आहे. ऐन कोरोनाच्या काळातही प्रताप सरनाईक यांचं दर्शन झालं नसल्याचे हे फलक आहेत. काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिका-यांनी आमदार हरवल्याची तक्रारही पोलीसांकडे नोंदवली होती. ओवळा-माजिवडा वा-यावर आमदार कागदावर, तीन महिने झाले हो – आमचा आमदार होता तो- कुठे गेला सध्या तो – झाला गायब हो तो, ओवळा-माजिवड्याचे आमदार हरवले-आपण त्यांना पाहिलंत का असे फलक लावण्यात आले असून या फलकांवर सामान्य मतदार असं लिहिण्यात आलं आहे. हे फलक कोणी लावले याची चर्चा सध्या सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading