जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारीत आराखडा त्वरित मंजूर करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश

जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारीत आराखडा त्वरित मंजूर करून शासनाला सादर करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा आढावा घेण्याबाबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाचा पुनर्विकासाचा प्रश्न गेले काही वर्षांपासून प्रलंबित आहे. या रुग्णालयाच्या जागी सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्यासाठी शिंदे गेली काही वर्षे प्रयत्नशील आहेत. नवीन पुनर्विकास प्रस्तावानुसार या रुग्णालयाची क्षमता 550 बेडसवरून वाढून 900 बेडस इतकी होणार आहे. तसेच, रुग्णालयाच्या इमारतीसोबतच नर्सिंग इमारतही प्रस्तावित आहे.सुधारित आराखड्यानुसार अंदाजे खर्च ३१४ कोटीवरून ५२७ कोटींपर्यंत वाढला आहे.पुनर्विकासाचा सुधारित आराखडा आरोग्य विभागाला सादर झाला असून तो लवकरात लवकर मंजूर करण्याची सूचना शिंदे यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading