शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब – आमदार राजू पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याचे सांगितले. यावर मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की , हा त्यांच्या पक्षांतर्गत चा विषय आहे. त्यांचं वय आणि आजार पाहता कुठेतरी थांबायला हवं यासाठी ते थांबले असावेत असे सांगत त्यांच्यावरती भाष्य करण्याएवढे आपण मोठे नाही. मात्र ज्या हालचाली चालल्या होत्या जे ऐकायला येत होते त्या अफवा असतील कदाचित त्या कुठेतरी थांबायला हव्यात यासाठी त्यांनी मास्टर स्ट्रोक खेळलेला असेल. हा त्याचा मास्टर स्ट्रोक आहे तो अनेक अंगानी असू शकतो ते पवार साहेब आहेत त्यांच्या बद्दल काय बोलणार असे सांगत शरद पवारांवर टीका केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading