शर्टावरील टेलरच्या खुणेवरुन लोकलमध्ये मरण पावलेल्या प्रवाशाची पटली ओळख

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकलमध्ये मृत्यू झाला होता. या मयत प्रवाशाच्या शर्टावर असलेल्या टेलरच्या नामपट्टीवरुन ओळख पटवून तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. गेल्या आठवड्यात एक प्रवासी कर्जत लोकलने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कर्जतच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासात त्याला अस्वस्थ वाटून त्याचा मृत्यू झाला. प्रवाशांनी त्याला डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरुन लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याचा मृतदेह कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. मेलेल्या प्रवाशाकडे त्याच्या ओळखीची कोणतीही खूण नव्हती. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना त्याच्या नातेवाईकांना शोध घेताना अडचणी येत होत्या. मेलेल्या प्रवाशाच्या शर्टवर फॅशन टेलरची पट्टी होती. त्यानंतर पोलीसांनी शोध घेत या टेलरला गाठले. या व्यक्तीचे नाव मेहबूब शेख असल्याचे टेलरने सांगितले. त्यानंतर मेहबूब यांच्या पत्नीने पतीला ओळखले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मेहबूब यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading