ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची खासदार राजन विचारें कडून पाहणी

ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची खासदार राजन विचारेंनी आज पाहणी केली.

हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी – संध्याकाळी कोपरी रेल्वे पुलाच्या अरुंद मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीमुळे होणारा खोळांबा टाळण्यासाठी या पूलाचे रुंदीकरणाचे काम एम एम आर डी ए व रेल्वे मार्फत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका तयार होऊन ९ ऑक्टोंबर रोजी याचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन नागरिकांसाठी खुला केला. परंतु दुसऱ्या टप्प्यातील ४ मार्गिका सुरू करण्यासाठी जुना रेल्वे पुल तोडण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस भराव भरण्याचे काम तत्काळ सुरु करा असे एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना बजावले. तसेच काही दिवसापूर्वी या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विनीत भालेराव या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित असलेल्या कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसोजा यांना विचारण्यात आला. हि बाब अतिशय गंभीर असून या तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयास कोणत्याही मदतीचा हात किंवा विचारपूस प्रशासनाकडून न मिळाल्याची खंत खा. विचारे यांनी व्यक्त केली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबियांस नोकरी किंवा आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. या पुलावरील खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक न बसविता उत्कृष्ठ दर्जाचे  मॅस्टिक पद्धतीने खड्डे २ दिवसात बुजविण्याचे आदेश रेल्वे व एम एम आर डी ए च्या प्रशासनाला केले आहेत. तसेच सदर पुलाचे काम ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे व एम एम आर डी ए च्या प्रशासनाकडून देण्यात आले.
पहिल्या टप्प्यातील ४ मार्गीका सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या खा. विचारे यांनी रेल्वे हद्दीतील वृक्ष स्थलांतर, विद्युत महामंडळाच्या वाहिनी शिफ्टिंग, पाण्याची लाईन अशा अनेक अडचणी रेल्वे अधिकाऱ्यांच्या समवेत बैठका घेऊन सोडविण्यात आल्या होत्या. त्यामुळे सततच्या पाठपुराव्यामुळे ४ मार्गिकेचे काम लवकर पूर्ण होऊन सुरू करण्यात आले. आज खासदार राजन विचारे यांनी पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे कोपरी पुलाच्या कामाची पाहणी केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading