वडाळा ते गायमुख पर्यंत मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी

ठाणे मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवास यांच्याकडे केली आहे. वडाळा- घाटकोपर -मुलुंड – ठाणे -कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख या दोन्ही मेट्रो मार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी श्रीनिवास यांची भेट घेतली. गेल्या ३ महिन्यापासून काही ठिकाणी काम बंद असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी हे काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केली आहे. ठाण्यातील मेट्रो मार्ग क्रमांक ४ मधील पॅकेज क्रमांक ८, १० आणि १२ मधील मार्गावर दोन ठेकेदारांच्या आडमुठी धोरणामुळे गेल्या तीन महिन्यापासून या मेट्रो मार्गाचे काम बंद आहे. त्यामुळे या मार्गावर लावलेल्या बॅरिकेट्समुळे पॅकेज क्रमांक १२ कापूरबावडी ते कासार वडवली या अरुंद रस्त्यावरून घोडबंदर मधील रहिवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नुकताच खासदार राजन विचारे यांनी श्रीनिवास यांची भेट घेऊन हा तिढा सोडवण्याची आणि या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गावर गरोडीया नगर ते सूर्यानगर पर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झालं आहे. गांधीनगर ते सोनापूर पर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. मुलुंड ते माजिवड्यापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण झालं आहे. कापुरबावडी ते कासारवडवली पर्यंत २० टक्के तर कासारवडवली ते गायमुख पर्यंत अवघे २६ टक्के काम झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading