लोकमान्यनगर वासियांना नागरी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

लोकमान्यनगर वासियांना नागरी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देतानाच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लोकमान्यनगरच्या समूह विकास योजनेला मंजुरी दिली जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. लोकमान्य नगर विभागातील चैतीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. ९०च्या दशकात साईराजची दुर्घटना झाली तेव्हा आपण नगरसेवक होतो. त्यावेळेपासून आपल्याला धोकादायक इमारतींचा प्रश्न माहिती असून त्यासाठी आपण अनेक आंदोलनंही केली. किसननगर, वागळे इस्टेट, जयभवानी नगर येथे प्रायोगिक तत्वावर समूह विकास योजना राबवण्यास मंजुरी मिळाली असून येथील नागरिकांनी गरजेपोटी घरं बांधली आहेत. येथील जनतेलाही या योजनेत सामावून घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लोकमान्यनगर येथील जलकुंभामुळे येथील पाणी प्रश्न सुटला असून आता नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. सध्याची लोकमान्यनगरची लोकसंख्या १ ते दीड लाखाच्या घरात आहे. लोकमान्य नगरला सध्या ९ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा होत असून तो किमान १५ दशलक्ष घनमीटर असणं आवश्यक आहे. इंदिरानगर जलकुंभात पाण्याचा साठा वाढवल्यास त्या जलकुंभातून ८ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी लोकमान्यनगर वासियांना देता येणं शक्य होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading