महापौरांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक

महापौर मिनाक्षी शिंदे यांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली. याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली. महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात यावी. भविष्यात महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी धमकी देणा-याचा युध्द पातळीवर शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा शोध तातडीनं न लागल्यास शिवसेना महिला आघाडी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading