लाईट बिलातील वीज वहन आकार नियमबाह्य असून यासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार – आमदार संजय केळकर

वीज बिलातील वहन आकार नियमबाह्य असून या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवून नागरिकांना न्याय द्यायचं काम करणार असे आमदार संजय केळकर यांनी कळव्यातील टोरंट ऑफिस येथे आज झालेल्या मीटिंगमध्ये सांगितले वीज देयकासह प्रत्येक ग्राहकाकडून वहन आकार वसूल केला जातो हा आकार नियमबाह्य असल्याचा दावा मंदार भट यांनी सांगितले. वीज वितरण कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकाकडून वीज वहनआकार वसूल करतात. राज्य सरकारी महावितरण कंपनी नोव्हेंबर 2016 पासून ही वसुली करीत आहे ही वसुली नियमबाह्य असल्याने ती एक प्रकारे लूट आहे या लुटीचा आकडा जवळपास 70 ते 80 हजार कोटी रुपये असल्याचा दावा मंदार भट यांनी केला आहे. आणि या संदर्भात ते न्यायालयीन लढा लढत आहेत. वहन आकार नियमबाह्य आहे वीज कायदा आणि त्यामधील सुधारणा नुसार हा वहन आकार केवल ओपन एक्सेस अर्थात 1 मेगा व्हॉटहुन अधिक थेट वीज खरेदी करणाऱ्या कडूनच वसूल करता येतो. पण राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्या हा आकार सर्वच ग्राहकाकडून वसूल करीत आहेत मुख्य म्हणजे ही वसुली फक्त महाराष्ट्रातच सुरू आहे महाराष्ट्रात शिंदे फडवणीस सरकार आहे आणि हे सरकार लोकहिताचे निर्णय घेणारा सरकार आहे त्यामुळे लोकांच्या हिताचा निर्णय हे सरकार घेईल आणि या संदर्भात आपण ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची शिष्टमंडल घेऊन भेट घेऊन त्यांना या संदर्भातली माहिती देऊ असे संजय केळकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading