महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलला ज्यूदो खेळात सुवर्ण पदक

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलने +७८ किलो वजनी गटात ज्यूदो खेळात सुवर्ण पदक पटकावले. अपूर्वाने पहिल्या फेरीत सोलापूरच्या शिवानी शिंदे, दुसऱ्या फेरीत नागपूरच्या इशिता कापता, तिसऱ्या फेरीत कोल्हापूरच्या सानिका गायकवाड हिच्यावर विजय मिळवला. अपूर्वा पाटील ही सरस्वती क्रीडा संकुलात देविसिंह राजपूत यांच्या मार्गर्शनाखाली सराव करीत असुन ती ज्युदोची आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. अपूर्वा पाटील ही पोलीस कन्या असून तिचे वडील महेश पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. अपूर्वाची निवड जुदोच्या राष्ट्रीय स्पर्धांकरीता झाली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading