रेल्वे प्रवासात ऐवज लांबवणाऱ्या चोरासह सराफ अटकेत

रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा उचलून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कळव्यातील तारू अली शेख या सराईत चोरटय़ासह चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या टिटवाळ्यातील अण्णासो सरक या सराफाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचे साडे दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीवरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने ऑगस्ट महिन्यातील दोन आणि सप्टेंबर महिन्यातील पाच घटनांची कबुली दिली. तसेच त्यातील तीन घटनांचा मुद्देमाल सराफाला विकल्याचे सांगितले. त्यानुसार सराफाला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच इतर चार गुन्ह्यातील मुद्देमाल शेख याच्या घरातून हस्तगत केला आहे. ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना 15 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading