रूस्तमजीच्या ३२व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय युवकाची आत्महत्या

ठाण्यातील रूस्तमजी इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय युवकानं आत्महत्या केली आहे. प्रथमेश परब हा मनिषानगर मधील देवेंद्र सोसायटीत राहत होता. तो राबोडीतील सरस्वती शाळेत अकरावीत शिकत होता. कळव्यातील त्याच्या शेजारील कुटुंब रूस्तमजी मधील अक्युरा सोसायटीत राहण्यासाठी गेले होते. त्यांना भेटायला म्हणून प्रथमेश काल संध्याकाळी घराच्या बाहेर पडला. मित्राला भेटल्यानंतर त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर दुस-या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या प्रथमेशनं इमारतीच्या ३२व्या मजल्यावरील कठड्यावर मोबाईल ठेवून मोकळ्या जागेतून खाली उडी मारून आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading