महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित आक्षेपार्ह संदेश व्हॉटस् ॲपवरून फॉरवर्ड केल्यामुळे घरात घुसून धुलाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित आक्षेपार्ह संदेश व्हॉटस् ॲपवरून फॉरवर्ड केल्यामुळे ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकाची घरात घुसून धुलाई केल्याची धक्कादायक घटना केली आहे. व्यवसायानं इलेक्ट्रीक कंत्राटदार असलेल्या प्रदीप राणे यांच्या मोबाईलवर ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आली होती. ती पोस्ट त्यांनी चुकून वृंदावन रहिवासी संघाच्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. याचा राग मनात धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव आणि त्यांचे सहकारी शीष आणि जमील अशा दोघांनी राणे यांना त्यांच्या घरात शिरून शिवीगाळ करत मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी पळत असताना पाठलाग करून राणे यांनी त्यांना जबरदस्तीनं माफी मागायला लावली आणि त्याचं चित्रीकरण करून व्हायरल केले. राणे यांनी अशी तक्रार पोलीसांकडे केली आहे. यापूर्वीही राणे यांनी असेच कृत्य केल्यानं त्यांना समज दिल्याचं विश्वजित जाधव यांनी सांगितलं. असे प्रकार घडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पध्दतीनं उत्तर दिलं जाईल असा इशाराही सेनेनं दिला आहे. प्रदीप राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading