राज ठाकरेंना नोटीस आल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्याच्या कारणावरून ठाण्यातील एका कार्यकर्त्यानं आत्महत्या केली आहे.
विटाव्यात राहणारा प्रवीण चौगुले यानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली असून तो जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांचा जवळचा मानला जातो. राज ठाकरे यांना ईडीची
नोटीस आली असून त्यामुळं त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. यामुळं आपण दुखावलो असून आत्महत्या करतोय असं प्रवीणनं त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी
सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं स्वत:ला पेटवून घेतलं. काल दिवसभर त्यानं राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर ब-याच पोस्ट टाकल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेच्या विविध आंदोलनात प्रवीण चौगुले नेहमी सहभागी असायचा. आज त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या राजकारणातील
पळवापळवी पाहता आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून आत्महत्या करणा-या प्रवीण चौगुलेची स्वामीनिष्ठा राज्याला वेगळी दिशा देणारी असल्याच्या भावना आमदार
जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading