जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी मिळवलं यश

डोंबिवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी यश मिळवलं आहे. या स्पर्धेत दीडशे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये रोहन शेलार, प्रचेता रिसबूड, हितेन बूटोला, प्रेरणा रिसबूड, अपूर्वा पाटील यांना सुवर्ण, जान्हवी पवार, वरूण शिंदे, ध्रुव बूटोला यांना रौप्य तर राज रोकडे आणि श्रध्दा गिरीनं कांस्य पदक पटकावलं. सुवर्ण पदक मिळवलेल्या खेळाडूंची निवड जळगाव येथे होणा-या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी झाली आहे. हे सर्व खेळाडू सरस्वती क्रीडा संकुलात देवीसिंग आणि भूपेंद्रसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading