मोघरपाडा गावात कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण करण्याचा डाव शेतक-यांनी उधळला

मेट्रो कारशेडसाठी सर्वेक्षण करण्याचा मुंबई महानगर प्राधिकरणाचा डाव शेतक-यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यानं उधळून लावला. प्राधिकरणाच्या अधिका-यांनी पोलीसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मोघरपाडा गावात कारशेडसाठी सर्वे सुरू केला. येथे १८७ कुटुंबं गेली अनेक वर्ष शेती करत आहेत. या भातशेतीवरच या कुटुंबांची घरं चालतात. या जागेवर मेट्रो कारशेडसाठी आरक्षण टाकण्यात आलं आहे. या कारशेडसाठी १०० एकर जागा प्राधिकरणाला हवी आहे. या जमिनीचं सर्वेक्षण करायला अधिकारी आले असताना शेकडो शेतकरी यावेळी जमले होते. याची माहिती मिळताच आमदार प्रताप सरनाईकही तात्काळ जागेवर पोहचले. कोणतीही नोटीस न देता कारशेडच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्याचं या शेतक-यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना सांगितलं. जमिन कारशेडसाठी दिली तर उपजिविका कशी करायची असा प्रश्नही या शेतक-यांनी उपस्थित केला. त्यावेळी सरनाईक यांनी प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि शेतक-यांना विश्वासात घेऊनच सर्वेक्षण केलं जाईल असं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading