आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान महत्वाचे असून समाजानं त्याची दखल घेणं आवश्यक – महापौर

आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान महत्वाचे असून समाजानं त्याची दखल घेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या २००व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेनं २०२० हे वर्ष परिचारिका प्रसविका वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. या अनुषंगानं मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था परिचारिकांच्या कामाची ओळख समाजाला व्हावी म्हणून वर्षभर अनेक कार्यक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात महापौरांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी महापौर बोलत होते. आरोग्य सेवेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक संख्येनं कार्यरत असलेल्या महिला परिचारिकांसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय सुविधा परिचारिकांना दिल्यास संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य बळकट होणं शक्य होईल असं या संस्थेच्या प्राचार्या संध्या खडसे यांनी सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या स्मरणार्थ दिवे सोडण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading