मेट्रोच्या ठेकेदारास तात्पुरत्या स्वरूपात विनामूल्य भूखंड वापरण्यास दिल्यानं महापालिकेचं कोट्यावधीचं नुकसान झाल्याचा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप

ठाणे महापालिकेनं मेट्रो कामाच्या ठेकेदारास तात्पुरत्या वापरासाठी एक मोठा भूखंड मोफत दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला असून आता २ वर्षानंतर या हस्तांतरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला असून त्याला अर्चना मणेरा यांनी हस्तक्षेप घेतला आहे. मेट्रोच्या कामासाठी शासकीय, निमशासकीय संस्थांच्या मोठ्या जागा मुंबई महानगर प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश आहेत. पण प्रकल्पाच्या ठेकेदाराला तात्पुरत्या वापरासाठी जागा देण्याचा उल्लेख नाही. मात्र प्राधिकरणानं ६ सप्टेंबर २०१८ मध्ये तात्पुरत्या वापरासाठी एका ७ हेक्टर खेळाच्या मैदानाची मागणी केली होती. प्रत्यक्षात महापालिका आयुक्तांनी सेक्टर ५ मधील जागा यासाठी परस्पर दिली. आता या हस्तांतरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सभागृहापुढे ठेवण्यात आला आहे. रेडीरेकनरच्या दरानुसार दरमहा यासाठी पालिकेला ४ कोटी भाडं मिळू शकलं असतं. यामुळं यातून महापालिकेचं ९६ कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचा आरोप मणेरा यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading