मुख्यमंत्र्यांनी राजकारणात लाज वाटणारे कृत्य केल्याची चिंतामणी कारखानीसांची टीका

टेंभी नाका येथील जय अंबे मातेच्या आगमनाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा केअर टेकर चंपा सिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांना शिंदे गटामध्ये प्रवेश देऊन राजकारणात लाज वाटणारे कृत्य केले असल्याची टीका एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी केली आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभी नाका जय अंबे मातेच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत चंपा सिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांनी आम्हास पाठिंबा असल्याचे जाहीर करून प्रवेश घेतला. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचं होत ? सत्तेची मस्ती की स्वतःचा मोठेपणा ? मातोश्रीवर बाळासाहेबांच्या सेवेसाठी अनेक सेवेकरी काम करत होते आणि आहेत. त्यामध्ये सफाई कामगार, जेवण बनवणारे वाढपे, सुरक्षारक्षक असे अनेकांचा समावेश आहे. यांचाही प्रवेश शिंदे गटात करून घेणार की काय ? असा सवाल कारखानीस यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांचं काम हे राज्याची धुरा वाहण्याच आहे. परंतु मुख्यमंत्री ठाकरे घराण्यावरील द्वेषापोटी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा निवासस्थानी हा प्रवेश घडून आणला असता तर एकवेळ क्षम्य होत. परंतु भर रस्त्यात ते सुद्धा देवीचे आगमन होत असताना केलेले हे कृत्य मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही. थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत होते. शिवसेना प्रमुख त्यांची अत्यंत काळजी घेत होते. त्यांना वेळोवेळी भरपूर मदत त्यांनी केली होती. शिवसेना प्रमुख स्वर्गवासी झाल्यानंतर थापा यांनी नेपाळला जाण्याचे ठरवले त्यावेळी सुद्धा त्यांना नेपाळ ला सन्मानाने पाठविण्यात आले. परंतु नेपाळ मध्ये त्यांचे मन रमले नसावे आणि ते मुंबईला परत आले. नोकरी सोडल्यामुळे त्यांना मातोश्री वरती पुन्हा रुजू करून घेतले नसावे. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळे असावे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे ते गेले असावेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र या गोष्टीचे भांडवल करत त्यांचा प्रवेश धार्मिक मिरवणुकीत करून घेतला हे कृत्य योग्य नसल्याची टीका चिंतामणी कारखानीस यांनी केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading