शिवसेना प्रमुखांची सेवा बजावणा-यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे वाद

शिवसेना प्रमुखांची सेवा बजावणा-यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे वाद निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. टेम्भी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानं वाद निर्माण झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले. या दोघांच्या प्रवेशासाठी खास मिरवणूक थांबवण्यात आली होती. या मिरवणुकीत हा पाठिंबा जाहीर झाल्यानं शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading